विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाचे स्वागत करत असताना उबाठा गटावर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवर टीका केली. तसेच २०१८ साली उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी मनमानी पद्धतीने निवड झाली होती, असेही शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडूनही या टीकेला उत्तर देण्यात येत आहे. जर २०१८ साली झालेली उद्धव ठाकरे यांची निवड मान्य नव्हती. मग त्यांच्या हातातून २०१९ साली एबी फॉर्म का स्वीकारला? असा प्रश्न ठाकरे गटाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्याच एका जुन्या ट्विटचा (आताचे एक्स) हवाला देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे वाचा >> श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? शिंदेच्या घराणेशाहीवरील टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्री शिंदे यांना २०१९ साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती. हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का?”, असा मजकूर लिहून अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. दानवे यांनी आपल्या मजकुरात ‘हुडी घालून आलेला माणूस’ असा उल्लेख केलेला आहे. यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केल्याचे दिसून आले.

आता हे ट्विट डिलीट करू नका

“जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून AB form का घेतला बरं?”, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एक्स अकाऊंटवर उपस्थित करण्यात आला आहे. या सोबत एकनाथ शिंदे यांचे जुने ट्विटही जोडण्यात आले आहे.

आणखी वाचा >> उद्धव ठाकरे गटावर अपात्रतेची कारवाई टाळण्यामागे राजकीय खेळी?

दरम्यान, काल (दि. १० जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी म्हटले, “हा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असते. शिवसेना हा मूळ पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिला आहे आणि धनुष्यबाणही आमच्याकडे दिले आहे. निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती ते लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच‌ चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही , हे या निकालाने अधोरेखित केले आहे.”

“अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल आहे. मतदारांच्या मताचा सन्मान करणारा आणि लोकशाहीत त्याचा निर्णयाधिकार अबाधित ठेवणारा हा निकाल आहे. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करू, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेने उभे राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.