Bhaiyyaji Joshi on Marathi Language: मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी मांडली होती. याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेत उमटले. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. आमदार अनिल परब म्हणाले, मुंबईचे तुकडे पाडण्याचा डाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आखला जात आहे. मुंबई तोडून ती गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट रचला जात आहे. सरकारने भय्याजी जोशी यांचा निषेध केला पाहीजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल परब म्हणाले की, मुंबईतील उद्योग तर गुजरातला पळवले आहेतच. आता मुंबईचे तुकडे पाडून त्यांची भाषा गुजराती असल्याचा कट रचला जात आहे. घाटकोपरमध्ये मराठी किंवा इतर भाषिक लोक राहत नाही का? मुंबईत वेगळ्याच प्रकारचे स्तोम माजवले जात आहे आणि त्याचा साधा निषेधही कुणी करत नाही. भय्याजी जोशी यांनी मुंबईची माफी मागायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही जसा सहन केला नाही, तसा मराठी भाषेवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही.

मुंबईत येणाऱ्यांना मराठी भाषा समजलीच पाहिजे. किमान त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी माणसाला डावलून गुजराती माणसाची मते मिळविण्यासाठी मुंबईचे गुजरातीकरण केले जात आहे. सरकारने याचा निषेध करायला हवा. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर अशा विधानांमुळे त्याला धक्का बसत आहे, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली. पण सभापती राम शिंदे यांनी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. ज्यामुळे विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

भय्याजी जोशी काय म्हणाले?

विद्याविहार येथील एका नामांतराच्या कार्यक्रमात बोलताना संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी म्हणाले, “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे, असे काही नाही.”

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान विधानसभेतही या विषयावरून गोंधळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठीच आहे, असे ते म्हणाले. आम्ही प्रत्येक भाषेचा सन्मान करतो. पण मराठीला डावलता कामा नये. जो स्वतःच्या भाषेचा सन्मान करतो, त्याने इतर भाषेचाही सन्मान केलाच पाहिजे, असे ते म्हणाले.