Sanjay Raut on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर बारामतीमध्ये जोरदार टीका केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पवारांनी भेटण्यास नकार देऊनही ते तासभर तिथेच बसून राहिले आणि त्यानंतर त्यांची भेट होताच तब्बल दीड तास भुजबळ-पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाल्याचे बोलले जात असले तरी यामागे वेगळेच राजकारण असल्याचे बोलले जात आहे. या विषयावर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे फिरत्या रंगमंचावरचे कलाकार असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार नटसम्राट

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे. खूपवेळा आपले रंग रुप बदलून नाट्य निर्मिती करण्यात ते तरबेज आहेत. भुजबळ अचानक शरद पवारांकडे कसे गेले? त्यानंतर राज्याच्या राजकारणात हंगामा झाला, हे सर्वांना माहीत आहेच. पण शरद पवार सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे पुढे काय होईल, हे सर्वांनी पाहावे. महाराष्ट्रात एक फिरता रंगमंच होता. छगन भुजबळ सारखे लोक याच फिरता रंगमंचाचे कलाकार आहेत. ते इकडून तिकडे फिरत असतात.

manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
Sangli, BJP, Vinod Tawde, NCP, Vinod Tawde met Shivajirao Naik, Sharad Pawar, Jayant Patil, Shivajirao Naik, Shirala Constituency, Mansingrao Naik, Devendra Fadnavis, mahayuti
विनोद तावडे यांचे सांगलीत बेरजेचे राजकारण
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
shinde group former mayor arvind walekar challenge ambernath mla dr balaji kinikar
लोणी खाणाऱ्याची हंडी दोन महिन्यांनी फोडणार; शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Aaditya Thackeray
Aditya Thackeray : “ही निवडणूक आहे, लढाई नाही, त्यामुळे राजकीय पक्षांनी…”; छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

हे वाचा >> IAS पूजा खेडकर यांच्या आईला रायगडमधून अटक, पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना दमदाटी करणं भोवलं!

लाडक्या बहिणीलाही दहा हजार द्या

“लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने नवनव्या योजना आणण्यास सुरुवात केली आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, छोटा भाऊ, मोठा भाऊ हे सर्व आता त्यांना आठवायला लागले आहे. विरोधकांनी या योजनांवर टीका केलेली नाही. सरकारी पैशांचे वाटप आणि त्यामाध्यमातून निवडणुकीचे जे राजकारण सुरू आहे, त्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत”, असे सांगून महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच लाडक्या बहिणीला १० हजार देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

संजय राऊत म्हणाले, “लाडक्या बारावी पास बेरोजगार भावाला महिना सहा हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे. पदवीधर बेरोजगाराला दहा हजार भत्ता मिळणार आहे. पण लाडकी बहिण खऱ्या अर्थाने घर चालवते. मग लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये का? आमची अशी मागणी आहे की, लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये मिळायला हवेत. तेव्हाच घर चालू शकेल आणि शेतकरी, बेरोजगारांच्या आत्महत्या थांबतील.”

हे ही वाचा >> “दिल्लीमध्ये काही लोक वेगळी भूमिका…”, शरद पवारांचं विधान चर्चेत; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतही केला उल्लेख!

एअर इंडियात नोकरीसाठी सुशिक्षित बेरोजगारांची झुंबड उडाली

एअर इंडियामध्ये दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी २५ हजार सुशिक्षित तरूणांची झुंबड उडाली, ही या महाराष्ट्राची भीषण स्थिती आहे. लाडक्या भावांप्रमाणेच लाडक्या बहिणीलाही १० हजार रुपये द्या, १५०० ने घर चालणार नाही. मुख्यमंत्र्यांचे घर तरी एवढ्या पैशांत चालेल का? मुख्यमंत्र्यांच्या घरातील बहीण, सून एवढ्या कमी पैशांत घर चालवू शकते का? यामाध्यमातून स्त्री-पुरुष समानता दाखवून द्या, अशी आमची मागणी आहे.

२८८ जागांची चाचपणी सुरू

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष २८८ जागांची चाचपणी करत आहे. तीनही पक्षांचा २८८ जागांचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही एकत्र बसून जागावाटपात कुणी कुठे लढायचे? हे ठरविणार आहोत. जो जिंकू शकेल, त्यालाच तो मतदारसंघ मिळेल, हे आमचे सूत्र असल्याचेही संजय राऊत म्हणाले.