शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता, या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले, “आमचा पक्ष आहे म्हणून उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. नेते गेले असले तरी आमचे कार्यकर्ते, शिवसैनिक जागेवर आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा होता. पण तुमचा पक्ष कुठे आहे? हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा. चोरलेल्या पक्षावर डींग मारू नका. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून दाखवावा. कुणी काकाचा पक्ष चोरतो, कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय. तेही दिल्लीतील दोन अनौरस बापाच्या ताकदीवर आणि निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा ताब्यात घेऊन, पक्ष चोरले जात आहेत.” अशा शब्दात संजय राऊत यांनी आक्रमक टीका केली.

हे वाचा >> “लवादानं शिवसेनेचा दिलेला निर्णय अध:पतन, म्हातारी मेलीच आहे अन् काळही सोकावून…”, राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका

जनतेच्या न्यायालयात जाहीर पत्रकार परिषद

“महाराष्ट्रात कधी विधानसभा अध्यक्षाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघाली नव्हती. विधानसभा अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे. या पदावरील व्यक्ती कधीही पक्षपाती नसते, त्याने निःपक्षपाती असावे, असे संकेत आहेत. परंतु राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. या सगळयाची चिरफाड करणारी एक महा पत्रकार परिषद शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या प्रतिमेची प्रेतयात्रा का काढण्यात येत आहे? ही परिस्थिती का उद्भवली. याबद्दल १६ जानेवारी रोजी वरळी येथील डोम सभागृहात जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत या अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड करतील”, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. इतिहासात पहिल्यांदाच अशी खुली पत्रकार परिषद होत असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.

मुरली देवरा एकनिष्ठ होते

मिलिंद देवरा यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीसाठी कुणी पक्ष बदलण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्याप्रमाणे देवरा यांनी पक्ष बदलला असेल. या विषयावर काँग्रेस पक्ष प्रतिक्रिया देईल, आम्ही त्यावर बोलणार नाही. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे तिथे अरविंद सावंतच निवडणूक लढवतील. तसेच आता विचारधारा, निष्ठा राहिलेली नाही. आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांना ओळखत होतो. पक्षाबद्दल त्यांची निष्ठा वादातीत होती. त्यांच्याकडून इतरांनी पक्षनिष्ठा शिकायला हवी होती.

नारायण राणे यांचा राजीनामा घ्यावा

केंद्रातील मंत्री नारायण राणे यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत देशातील चार शंकराचार्यांनी काही शास्त्रीय भूमिका व्यक्त केली आहे. त्यावर मतभेद असू शकतात. हिंदू धर्माचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडून पाहिले जाते. वेद-पुराणात तज्ज्ञ असल्यामुळेच ते शंकराचार्य पदावर बसले आहेत. शंकराचार्य यांना काय कळतं? असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून २२ जानेवारी आधी भाजपाने या विधानावर दिलगिरी व्यक्त करावी.