“भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांना साधेपणाने राहण्याचा सल्ला दिला. ५० लाखांचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका, सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, असे जेपी नड्डा म्हणाले. म्हणजे मोदी करतात तसं गरीबीचं ढोंग करा, असे त्यांना सुचवायचं असेल”, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. जेपी नड्डा यांचा सल्ला खरंतर पंतप्रधान मोदी यांनाच लागू पडतो. मोदींइतकी श्रीमंती गेल्या ७० वर्षांमध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नव्हती. मोदींचा हा श्रीमंतीचा थाट जनतेच्या पैशावर सुरू आहे. निवडणूक रोखे आणि पीएम केअर फंडात अब्जावधींच्या भ्रष्टाचाराची रक्कम भरण्यात आलेली आहे, त्यावर हा थाट सुरू असल्याचीही टीका संजय राऊत यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीच्या जागावाटपाचा पेच सुटला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात एक तास चर्चा

पंतप्रधान मोदींच्या पेनाची किंमत २५ लाख

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिशाला असलेल्या पेनाची किंमत २५ लाख रुपये आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. तसेच मोदींच्या हातातील घड्याळ, त्यांचे कपडे अतिशय महागडे आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. मोदी ज्या विमानातून फिरतात, ते खास त्यांच्यासाठी २० हजार कोटी खर्च करून घेतले आहे. मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश असून त्यात चहा विकणारा कुणीही नाही. भाजपा एकाबाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडते. शेतकऱ्यांची हत्या करते, महाराष्ट्रातील गरीबांची थट्टा करते, आमदारांना ५० कोटी देऊन सरकारं बनविले जाते आणि दुसऱ्या बाजूला महागड्या गाड्या, घड्याळं वापरू नका, असे आवाहन केले जाते. जेपी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहीजे. भाजपाच्या शंभर टक्के नेत्यांच्या हातात महागडी घड्याळं आहेत. ९० टक्के भाजपा नेते परदेशी गाड्यातून फिरतात, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘मागची दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी’, मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल फडणवीस म्हणाले…

३७० चा आकडा गाठण्यासाठी यंत्रणा ताब्यात

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून लबाडी करण्यात येते हे चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भाजपा ३७० जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. याचा अर्थ हा आकडा गाठण्यासाठी तुम्ही आधीच यंत्रणा ताब्यात घेतलेल्या आहेत. ही लोकशाहीची थट्टा आहे, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर टीकास्र सोडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader sanjay raut slams pm narendra modi and bjp over jp nadda statement kvg