UBT Leader Uddhav Thackeray on BJP Devendra Fadnavis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, असेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
एक तर तू तरी राहशील नाहीतर मी राहील
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुरमीही उतरवू. सगळं सहन करून मी उभा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल, असेही आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले. याचा संदर्भ देत असताना ते म्हणाले, “मला आणि आदित्य ठाकरेला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी आव्हान देत आहे.”
हे वाचा >> “त्या गद्दारीचे सरदार कोण होते? हे देखील…”, सुनील तटकरेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत असा नडलो की, पंतप्रधान मोदींनाही घाम फोडला. माझी अपेक्षा होती की, मुंबईच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहीजे होत्या. म्हणजे त्यांच्या अंगावर कपड्याचे जे काही चार-दोन तुकडे उरले होते, तेही उतरविले असते.
भाजपाचा पलटवार
उद्धव ठाकरेंचे विधान पुढे येताच भाजपाकडून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तुम्ही अंगावर येण्याची भाषा वापरात आहात. तुम्ही गुरमी उतरविण्याची भाषा वापरता. पण जनताच तुमची गुरमी उतरविल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या ‘अरे ला कारे’ करेल, असे प्रतिआव्हानही त्यांनी दिले. बावनकुळे यांच्यासह भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनीही यावर लागलीच प्रतिक्रिया दिली.
हे वाचा >> Sanjay Raut :”महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला…”; संजय राऊत यांची बोचरी टीका
बातमी अपडेट होत आहे…