शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे रविवारी (४ फेब्रुवारी) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात त्यांनी सभा घेतल्या. कणकवली येथे घेतलेल्या सभेत त्यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली. राणे कुटुंबिय अश्लाघ्य भाषेत टीका करतात, त्यांच्या टीकेला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची गरज नाही, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, “राजापूरची गंगा म्हटली जाणारी नदी पवित्र आहे. पण दुर्दैवाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एक गटारगंगा आहे आणि ती गटारगंगा खूप घाणेरडी आहे. आम्ही नेहमी मोदी, मोदी करतो असे तुम्ही म्हणाल. पण आपल्याला जेवढं बोललं जातं, त्याबदल्यात त्यांना थोडं तरी बोलावं लागेल ना. पंतप्रधान मोदी मध्यंतरी कुठल्या तरी राज्यातील प्रचारसभेत बोलले होते की, मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो. पंतप्रधान मोदीजी तुम्ही जर रोज शिव्या खात असाल तर तुमची भोकं पडलेली इथली तिनपाट मंडळी आम्हाला काय रसगुल्ले देतात का?”

“सरकारमध्येच गँगवॉर सुरु झालंय, एक मिंधेची गँग, एक भाजपाची गँग आणि…”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “म्हणून मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगतो की, त्यांना संस्कृती नाही, त्यांच्यावर संस्कार नाहीत. ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचे नाही. पण ते माझ्यावर, आपल्या कुटुंबावर जर बोलले तर त्यांच्या वाक्यातून फक्त माझं नाव बाजूला ठेवायचं आणि भाजपातील वरपासून खालपर्यंत कोणत्याही नेत्याचे नाव अगदी बेधडक त्यांच्याच टीकेत जोडून लिहायचं आणि वाचायचं. मग मोदीजींना समजेल शिव्या काय असतात.”

“भाजपाबरोबर आम्ही २५ वर्ष होतो. पण आमच्या हिंदुत्वात आणि भाजपाच्या हिंदुत्वात फरक आहे. आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं आहे, तर त्यांचे हिंदुत्व घर पेटवणारं आहे. आम्हीही श्रीरामाचे भक्त आहोत. पण आम्ही भाजपामुक्त श्रीराम म्हणतो. भाजपा जेव्हा देशात अस्पृश्य होती, तेव्हा माझ्या वडिलांनी तेव्हा भाजपला राज्यात तारलं आणि त्यांचा मी सुपुत्र आहे. आज घराणेशाही बोलता. शिवसेनाप्रमुख नसते तर अटल बिहारी वाजपेयींनी यांना उचलून केराच्या टोपलीत टाकलं असतं. जर भाजपा पक्षात थोडीतरी मर्दमुकी असेल तर तुम्ही तुमचे घरगडी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि नाईलाजाने पोलिस यांना बाजूला ठेवा आणि समोर या. मग बघू कोण कुणाच्या पाठीला माती लावतो”, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

“त्या मिंध्याला कुठूनही खेचून आणला असता, पण…”, आमदार फूटीवर उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया

काल परवा भाजपाच्या आमदाराला पोलिस स्थानकात गोळीबार करावा लागला. ज्याच्यावर गोळ्या झाडल्या त्याची चिंताजनक आहे. मी गोळीबाराचे अजिबात समर्थन करत नाही. पण त्या आमदार गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का, की गोळीबारात जर मृत्यू झाला तर त्याला फाशी होऊ शकते. त्याने गोळीबार का केला? दोन गोष्टी आहेत. एक माणूस आत्महत्या करतो तेव्हा तो पराकोटीचा खचलेला असतो आणि जेव्हा तो खून करतो तेव्हा तो पराकोटीचा डिवचलेला असतो, त्यामुळे गणपत गायकवाडला डिवचण्यासारखी कोणती परिस्थिती उद्भवली, याची चौकशी झाली पाहिजे.

Story img Loader