Beed Crime News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक महिना उलटून गेला आहे. तरीही अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचे जाहीर केले असले तरी बीडमधील वातावरण शांत झालेले नाही. शनिवारी परळी तालुक्यात एका विद्यमान सरपंचाला राख वाहून नेणाऱ्या टिप्परने धडक दिली. या धडकेत दुचाकीवर बसलेल्या अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्याने बीड जिल्ह्याला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीडला केंद्रशासित प्रदेश करा

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना बीडमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “बीडमध्ये सातत्याने होणाऱ्या हत्या हा गंभीर विषय बनला आहे. कालही एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला. पण तीही हत्याच वाटते. गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरपंचांच्या जीवावर भ्रष्टाचारी टोळके उठले आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बीड जिल्ह्याला केंद्रशासित प्रदेश करून तुमच्या अधिपत्याखाली ठेवावा. तरच तिथे काही बदल होतील.”

हे वाचा >> Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय

बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष न दिल्यास तेथील भूमाफिया, वाळू माफिया यांचे सिंडिकेट लोकप्रतिनिधींना जगू देणार नाहीत, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

परळीत टिप्परनं सरपंचाला चिरडलं

परळी तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शनिवारी (दि. ११ जानेवारी) रात्री परळीच्या दिशेने जात होते. यावेळी साडे आठच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली. या धडकेत क्षीरसागर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली असून हा अपघात की घातपात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे. संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही राखेची अवैध वाहतूक करणारे टिप्पर बंद झालेले नाहीत. याला परळी पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत.