पहिल्या महायुध्दापासून शौर्य गाजविणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावी यंदा ७८ वा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. हा उस्तव उद्यापासून (दि. ८) साजरा होत आहे. जिल्ह्यातील एकमेव असलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात दररोज आरती, पूजाअर्चा करण्यात येत असून आजही हे व्रत गावकरी मनोभावे पार पाडत आहेत. शिवाजी महाराजांच्या मावळ्याचे खरे वारसदार शोभणाऱ्या १४ हजार लोकवस्तीच्या या गावातील २१०० हून अधिक तरूण सन्यदलात सहभागी होउन देशाच्या सीमांचे रक्षण करीत आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावाला सनिकी गणवेशाचा वारसा पहिल्या महायुध्दापासून लाभला आहे. १९१८ मध्ये झालेल्या पहिल्या महायुध्दात दोस्त राष्ट्राकडून शौर्य गाजवित असताना तीन तरूण धारातीर्थी पडल्याचे आजही आवर्जून व अभिमानाने सांगितले जाते. तर दुसऱ्या महायुध्दात ६ सनिकांनी ब्रिटिश सत्तेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजच्या घडीला गावात ९३७ निवृत्त सनिक असून २ हजार १०० हून अधिक तरूण नौदल, वायुदल आणि पायदळात सेवा देत आहेत. अशा या सनिकी परंपरा असलेल्या गावात १९३८ मध्ये कॅप्टन पतंगराव भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवून मंदिराची उभारणी केली. या मंदिरात रोज नित्यनेमाने पहाटे पूजा करून आरती म्हणण्यात येते. शिवाजी महाराजांची पूजा करण्याचा मान कोणा एका पुजाऱ्याला देण्यात आलेला नाही. मात्र गावात असलेल्या प्रत्येक कुटुंबाला हा मान मिळालेला असून रोज एका घरातील प्रमुख सपत्नीक पूजा करण्यासाठी पहाटे सहा वाजता मंदिरात येतात. मंदिरातील महाराजांची मूर्ती स्वच्छ करण्याबरोबरच मंदिराच्या दर्शनी भागात सडा मारून रांगोळी काढण्यात येते आणि उपस्थितांसोबत आरती म्हणण्यात येते. गेली ७८ वष्रे ही परंपरा कोणत्याही अडथळ्याविना अखंडपणे गावाने जोपासली आहे.
यंदाही शिवजयंती उत्सव परंपरेप्रमाणेच साजरा करीत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सलग सात दिवस शिव-शंभो जन्मोत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने उद्या रविवारी विशाळगडाहून आणल्या जाणाऱ्या शिवज्योतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच, वृक्षारोपण, शाळकरी मुला-मुलींसाठी रांगोळी, चित्रकला, निबंध आणि सामान्यज्ञान यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रविवारी १५ मे रोजी भव्य मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात शौर्याची आणि कर्तृत्वाची पूजा करण्याचा प्रघात गेली पाऊणशे वर्ष जोपासला आहे. याचबरोबर सनिकांच्या आíथक अडचणीवेळी मदत करण्यासाठी माजी सनिक पतसंस्थाही कार्यरत असून या पतसंस्थेच्या चार शाखा कार्यरत असल्याचे माजी अध्यक्ष संजय भोसले यांनी सांगितले.
जवानांच्या रांजणी गावात यंदा ७८ वा शिवजन्मोत्सव
पहिल्या महायुध्दापासून शौर्य गाजविणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावी यंदा ७८ वा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे.
Written by दिगंबर शिंदे
Updated:
First published on: 08-05-2016 at 00:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji maharaj birth anniversary celebration