अलिबाग – गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवभक्त संतापले आहेत. याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर विकिपीडियावर दुरुस्ती करण्यात आली आहे. गुगल आणि विकिपीडिया हे दैनंदिन माहिती मिळण्याचे स्त्रोत समजले जातात. जगभरातील माहिती गोळा करण्यासाठी या दोन माध्यमांची मदत घेतली जाते. मात्र गुगल वर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्रीचाचे असा करण्यात आल्याचं रविवारी दिसून आलं यानंतर याच्या समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “काँग्रेसने नाही केलं, ते तुम्ही…”, इंदिरा गांधींचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

हेही वाचा >>> तीन चिन्ह, तीन नावं.. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव; म्हणाले, “लवकरात लवकर…!”

मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून सारखेल कान्होजी राजे आंग्रे यांना ओळखले जाते. ब्रिटिश डच पोर्तुगीज यांची अनेक आक्रमण त्यांनी परतावून लावली. भारतीय नौदलाकडून त्यांना मेंटोर म्हणून बघितले जाते. अशा कान्होजी राजे आंग्रे यांचा उल्लेख गुगलवर समुद्रीचाचे असा केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमींनी यावर आक्षेप नोंदवला असून यासाठी एक मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा”; भाजपा आमदाराची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

  हिंदवी स्वराज्याच्या नौदलाचा प्रमुख सरखेल, अठरा किल्ले आणि सलाना दोन कोटी महसूल आलेल्या भू भागाचा कर्तुम अकर्तुम अधिपती. किमान अडीचशे गलबत, गुराब, मचवे, फ्रिगेट चे दल बाळगणारा सेनानायक. ज्याच्या शिक्क्याच्या “दस्तका” शिवाय इंग्रज – पोर्तुगीज आदी पश्चिमी सत्तांचे एकही जहाज पश्चिम सागर भ्रमण करु शकत नव्हते असा सागराधीपती. ज्याने एकहाती इंग्रज आणि पोर्तगीज यांचा सागरी उन्माद उधळून लावत मराठा जरी पटक्याचा दरारा सागरावर प्रस्थापित केला, अशा विराचे पायरट हे वर्णन समस्त भारतवासीयांच्या करीता अपमानास्पद आहे. यावर आक्षेप नोंदवणे गरजेचं आहे.

– रघुजीराजे आंग्रे कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज

आक्षेप कसा नोंदवाल

गुगलवर जायचं, कान्होजी आंग्रे सर्च  करायचं- त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर जिथे हे pirate लिहिलेलं दिसतंय त्या पुढे उजव्या कोपऱ्यात ३ : उभे डॉट्स असतील त्यावर क्लिक करुन incorrect असा फीडबॅक नोंदवा असे आवाहन शिवभक्तांनी केले आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji maharaj devotees were enraged when kanhoji angre called angre pirate google wikipedia ysh