Shivaji Maharaj Statue : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. हा पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) डिसेंबर २०२३ मध्ये उभारण्यात आला होता. पंतप्रधान मोदीही या सोहळ्याला उपस्थित होते. हा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीकडून सरकारवर टीका केली जाते आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना जोरदार उत्तर दिलं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही तो फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे महायुतीत बेबनाव निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय घडली घटना?

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या पुतळ्याची ( Shivaji Maharaj Statue ) उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले असले तरी, विरोधी पक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर या दुर्घटनेचे खापर फोडले आहे. या घटनेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली तर, रवींद्र चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनीही राज्य सरकारवर टीका केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं.

हे पण वाचा- Kiran Mane : “मालवणच्या शिवरायांच्या पुतळ्याला लवून नमस्कार केला होता, पण आता त्यामागचा भ्रष्टाचार..”, किरण मानेंची पोस्ट

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. सगळ्यांनाच वेदना झाल्या आहेत. यावर कोणीही राजकारण करु नये. महाराष्ट्र सरकारने पुतळा उभारला नव्हता तर नौदलाने उभारला होता. ज्यांना हे काम देण्यात आलं त्यांना कदाचित इतक्या वेगाने तिथे वारे वाहतात याचं आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी आम्ही नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांचा फोटोही पोस्ट केला आहे.

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अमोल मिटकरींची पोस्ट काय?

“महाराज माफ करा कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडून पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय, मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी.”

अमोल मिटकरी यांनी ही पोस्ट करुन सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून जे म्हटलं त्यानंतर अशाच प्रकारचा आरोप अमोल मिटकरींनी सरकारवर केला आहे. एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांचा फोटोही पोस्ट केला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या पोस्टमुळे महायुतीत बेबनाव असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.