शिल्पकार राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांची ग्वाही

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एप्रिल पर्यंत उभारण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी व्यक्त केला. समुद्र किनारी पुतळा उभारणे हे एक मोठे आव्हान  असून राम सुतार आर्ट क्रिएशनने  यापूर्वी समुद्र किनारी पुतळा उभारला नाही, मात्र आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा तसेच राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असे दोन पुतळे आम्ही समुद्र किनारी उभारत आहोत.

राजकोट येथे शिवरायांचा पुतळा समुद्र किनारी असल्याने त्यासाठी आयआयटीने मुंबई कडून लागणाऱ्या मान्यता व आवश्यक ती काळजी घेऊन काम करण्यात येत आहे. ब्राँझ पासून बनविण्यात येणारा शिवाजी महाराजांचा पुतळा हा हजारो वर्षे टिकेल असा दृढविश्वास राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा लिमिटेड कंपनीचे व्हाईस प्रिसिडेंट श्री अनिल राम सुतार यांनी मालवण येथील किल्ले राजकोट येथे बोलताना व्यक्त केला

मालवण राजकोट येथील बहुचर्चित  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्याचे काम श्री राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला राज्य शासनाने दिल्यानंतर  आज व्हाईस प्रेसिडेंट श्री अनिल राम सुतार यांनी मालवण राजकोट किल्ला येथे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बनविण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली  त्यांच्यासमवेत इंजिनियर अभिषेक लोहार हे उपस्थित होते याबाबत बोलताना त्यांनी अनेक विषयावर पत्रकारांची संवाद साधला.

श्री अनिल सुतार म्हणाले शिव पुतळा उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले पार्ट्स येण्यास सुरुवात झाली आहे. यात ज्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराज उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचे भाग बसवण्याच्या कामास उद्यापासून सुरुवात होणार आहे. यात उर्वरित पुतळ्याचे भागही येथे येण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक आठवड्यात हे भाग येथे दाखल होतील. आतापर्यंत पुतळ्याचे गळ्यापर्यंतच्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. जसजसे भाग येथे दाखल होतील. त्यानुसार पुतळ्याच्या वेल्डिंगचे काम हाती घेतले जाणार आहे असे सांगून त्यांनी येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी दिली.

Story img Loader