आठवडय़ाभरपासून आर्णी तालुक्यात गारपीट व मुसळधार पावसाने वेळीवेळी थमान घातल्याने बळीराजा धास्तावला असला तरी मंत्री असो की खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या दुखाची जाणीव करून घेतलेली नव्हती, परंतु सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी तालुक्यातील काही गारपीटग्रस्त गावांना बऱ्याच दिवसांनी का होईना अखेर भेट दिली.
अगोदरच खरीप पिके अति पावसामुळे व महापुरामुळे बुडीत निघाल्यानंतर रब्बी पिकांचे हंगामावर भिस्त असलेला शेतकरी आता या अस्मानी संकटामुळे घर कां ना घाट का, अशा स्थितीत आला आहे. सतत १० दिवसापासून अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्याचे आíथक बजेट पार गडबडले असून अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकरी या संकटाला कसा पेलवणार, अशी भयावह अवस्था निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना या संबंधात निवेदन दिली व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. लाखो रुपयांची पिकाची नासाडी झाली असतांना मात्र अद्याप शासनाकडून कोणताही अíथक आधार शेतकऱ्यांना मिळालेला नाही. उलट, मंत्री असो की खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या दुखाची जाणीव करून घेतलेली नाही.
मागील आठवडय़ात आर्णीसह तालुक्यात सुमारे ३० ते ३५ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे रब्बी हंगामातील हरबरा व गहू ही पिके पार उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखा रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आíथक मदतीची आवश्यकता असतांना केवळ आचारसंहितेचा बागुलबुवा करून संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्षात पाहणी करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आíथक मदतीची ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची भूमिका उदासीन दिसून येत आहे.
शिवाजीराव मोघे यांनी मात्र संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीसंदर्भात पुरेशी दखल का घेतली नाही, असे सुनावले.
तेंडोळी, दाभडी या गावांना मंत्र्यांनी भेट दिली असली तरीही तालुक्यातील चिखली (इजारा), काठोडा, देउरवाडी (बुटले), कुरा, िपपळनेर, जवळा, सुकळी, परसोडा, जांब, पांढुर्णा, कोप्रा, बोरगांव, उमरी, चांदणी, लोणी, शेकलगांव, ब्राम्हणवादा, हेटी आदी गावांना मोठा फटका बसला आहे. याप्रसंगी मोघेंनी शेतकऱ्यांची नुकसानी संदर्भात कैफियत समजून घेतली.

Story img Loader