भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे (महाबळेश्वर) गावी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी आले असल्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी आणि केळघर येथील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी आलो असल्याचे सांगत राज्य पातळीवर चाललेल्या राजकारणाचा आणि आमचा काही संबंध येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपातळीवर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेत असतात. यांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचे आमदार काम करू. कास येथील अतिक्रमण काढण्याबाबत मुख्यमंत्री आणि माझी चर्चा झाली होती. या परिसरात असलेली १५४ बांधकामे नियमित करावीत असे आमचे बोलणे झाले होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढल आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्री यांनी १५४ बांधकामे रेग्युलरराईज करण्याचा निर्णय झाला असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे.
सातारा पर्यटन स्थळ कास पठारावरील १५४ बांधकामांना अधिकृत करावे मागणीसाठी व मतदार संघाच्या विविध प्रश्नांसाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांची शिवेंद्रराजे भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांनीही त्यांची भेट घेतली.