छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सजावट आणि रोशनाई करण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवजयंतीची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी देखील जल्लोषात सुरू असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरीवर शासकीय पूजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे देखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवजयंती निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी छ. शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. ट्विटरवर अनेक मान्यवरांनी आणि ट्विटर युजर्सनी शिवाजी महाराजांचे स्मरण केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

राज्यवर्धन राठोड यांनी देखील शिवाजी महाराजांचे स्मरण करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. परभणीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सजावट करण्यात आली आहे. आज शहरात मोठी मिरवणूक निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्युत रोशनाई करण्यात आली आहे.