नाशिक येथे शिवजयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मनसेचे आ. वसंत गिते, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, माजी महापौर विनायक पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकडीबारव येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मनसे, शिवसेनाप्रणीत मंडळांचा मिरवणुकीत वरचष्मा होता. डी. जे. साऊंड सिस्टीम्सचा दणदणाट अन् संगीताच्या तालावरील आकर्षक विद्युत रोषणाई, हे मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. अनेक सार्वजनिक मित्रमंडळांनी देखाव्यांत शिवरायांचे दर्शन घडविले.                (छाया – मयूर बारगजे)

Story img Loader