शासनामार्फत यावर्षीचा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात येणार असून वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने व इतर ठिकाणी साजरे करण्यात येणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवप्रताप दिन साध्या व कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करावा अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.

शिवप्रताप दिनाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर -चौगुले, महाबळेश्वर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे आदी उपस्थित होते.

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
article pay tribute to world renowned mridangam scholar varadarao kamalakara rao
व्यक्तिवेध : व्ही. कमलाकर राव
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी सोमवार (दि. २१) रोजी शिवप्रताप दिनी प्रतापगडावर करण्यात येणारे धार्मिक कार्यक्रम पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात यावेत. प्रतापगडावर देवीची पुजा, ध्वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात यावे इतकेच शासकीय कार्यक्रम घ्यावेत. सोहळ्यादरम्यान करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत व कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर पालन होईल याबाबत पोलीस विभागामार्फत योग्य ती कार्यवाही व बंदोबस्त ठेवण्यात यावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.

वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येणारा शिवप्रताप दिन सद्याच्या परिस्थितीमुळे व आदेशामुळे करता येणार नाही असे वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर -चौगुले व तहसीलदार रणजित भोसले पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. अरे वाई येथील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने वीर जीवा महाले पुरस्कार चारुदत्त आफळे पंताजी काका वकील, बोकील पुरस्कार गोरक्षक ऍड कपिल राठोड यांना देण्यात येणार होता. परंतु सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असे प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले कळवले आहे.