शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामुळे गडाच्या संवर्धनासाठी आणि सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वागीण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आराखडय़ास आपण याच ठिकाणी मंजुरी देत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते किल्ले रायगडावर आयोजित ३४२व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलत होते. येत्या तीन वर्षांत रायगडाचा कायापालट केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
राज्यातील सर्व गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन तयार आहे. यासाठी आमची तिजोरी खुली आहे. आमच्याकडील किल्ले ‘ब’ दर्जा प्राप्त आहेत, त्यामुळे पुरेशी आíथक मदत देश-विदेशातून मिळत नाही. रायगडासारखा महत्त्वाचा किल्लादेखील उपेक्षित राहिला आहे, त्यामुळे अशा सर्व महत्त्वाच्या किल्ल्यांना ‘अ’ दर्जा कसा मिळेल हे पाहण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नात कुठेही कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत जगातील महत्त्वाची स्थळे आहेत, मात्र महाराष्ट्रातील विशेषत: शिवरायांचे गड-किल्ले कुठेच दिसत नाहीत ही आपल्यासाठी योग्य बाब नव्हे. काही दिवसांपूर्वीच संभाजी राजे आपणाशी यासंदर्भात बोलले असून राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करून या किल्ल्यांना जागतिक महत्त्व प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
मराठा आरक्षण या मुद्दय़ावर आमच्या शासनाची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असून विधिमंडळातदेखील आम्ही यासंदर्भात प्रस्ताव संमत केला आहे, मात्र आता न्यायालयात भक्कमपणे संशोधन करून बाजू मांडण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यानिमित्ताने ‘राजधानी रायगड’ या माहिती व जनसंपर्कच्या कोकण विभागाने तयार केलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. किल्ल्याची माहिती आणि अप्रतिम छायाचित्रे असलेले शासनाने काढलेले हे पहिलेच कॉफी टेबल बुक आहे.