पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १० ते १२ जणांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला. यावेळी तसेच यावेळी ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजीही करण्यात आली. आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर तेथून उदय सामंत ताफा जात होता. यावेळी सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “मी आधी बोललो नाही, पण आज मुलगा म्हणून बोलतोय, गद्दारांनी…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

दरम्यान, या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. आक्रमक भाषणांमधून असे प्रकार घडत आहेत. आक्रमक भाषण करण्याचा उद्देश हाच आहे. त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यासाठी आदित्य ठाकरेंची यात्रा सुरू आहे.”, असे केसरकर म्हणाले.