राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे ती शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीची. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती करत असल्याचं शुक्रवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यावरून आता भाजपा, मनसे, शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या या निर्णयाला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणत खोचक टीका केली असताना आता शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले होते फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर आपली भूमिका मांडली. माध्यम प्रतिनिधींनी विचारणा करताच “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी”, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मी त्यावर एवढंच म्हणेन की…”, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया!

दरम्यान, यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विधानाविषयी माध्यमांनी विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेनेनं कुठेही भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका कायम स्पष्ट राहिली आहे. ज्यांना आमची मतं, भूमिका पटली, ते आमच्यासोबत येतील. गेल्या अडीच वर्षांत देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्याच आधारावर एकत्र आलो आणि सोबत राहिलो. ज्यांना आमची भूमिका मान्य असेल, ते सोबत येतील”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Video : “शिल्लक सेनेसोबत संभाजी ब्रिगेडने..”, शिंदे गटाकडून राष्ट्रवादीचा उल्लेख करत शिवसेनेवर आगपाखड!

शुक्रवारी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी या युतीचं समर्थन केलं आहे. “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीचं स्वागत केलं आहे.