कॉंग्रेसचे शिर्डीतील उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना सोमवारी शिवसैनिकांनी मारहाण केली. वाकचौरे सध्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात असून, तिथे शिवसेना आणि कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते परस्परविरोधी घोषणा देत असल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेल्या वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॉंग्रेसने त्यांना शिर्डीतून उमेदवारीही दिली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगमनेरमधील कार्य़कर्त्यांना भेटण्यासाठी वाकचौरे सोमवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात गेले होते. शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाशेजारीच शिवसेनेचेही कार्यालय आहे. वाकचौरे येणार असल्याचे कळल्यामुळे शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा मोठा जमाव होता. वाकचौरे तिथे आल्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणा देत त्यांना मारहाण करण्यात आली.

Story img Loader