अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने आहेत. शिंदे गटाने आपला उमेदवार दिलेला नसला तरी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या रॅलीत सहभागी होत पाठिंबा दर्शवला आहे. अर्ज भरण्याआधी ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्याकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत असून समर्थनासाठी मोठे नेते सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरेदेखील ऋतुजा लटकेंना समर्थन देण्यासाठी रॅलीत सहभागी झाले असून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही ‘माणुसकी विरुद्ध खोकासूर’ अशी लढाई असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“ज्याप्रकारे ही निवडणूक होत आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात राग आणि दु:ख आहे. एखाद्या महिलेला सतवणं किती योग्य आहे? महापालिका आणि खोके सरकार ऋतुजा लटके निवडणूक कशा लढणार नाहीत यासाठीच प्रयत्न करत होते. पण कोर्टाने त्यांना दणका दिला आहे. सर्व निष्ठावंत सैनिक आज येथे आले असून, महाविकास आघाडीचे घटकही आले आहेत,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

मोठी बातमी! शिंदे गट अंधेरी पोटनिवडणूक लढणार नाही, ऋतुजा लटकेंविरोधात भाजपाचे मुरजी पटेल मैदानात, म्हणाले “खरी शिवसेना…”

“अशा निवडणुकींमध्ये विरोधी उमेदवार देणं योग्य नसतं. पण त्या परिस्थितीतही खोके सरकारने जे खेळ केले त्यातून त्यांचं काळं मन समोर आलं आहे. शिवतीर्थ असो किंवा लटकेंची लढाई, पालिकेवर हुकूमशाहीचा दबाव आहे. हे राजकारण भलतीकडे चाललं आहे. यातून खोके सरकार निर्दयी असल्याचं समोर येत आहे. माणुसकी विरुद्ध खोकासूर अशीच ही लढाई झाली आहे,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

‘हिंमत असेल तर मैदानात या’, जाहीर आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाने दिलं उत्तर, म्हणाले “आम्ही कुठे घरात…”

“निवडणुकीच्या आधीपासूनच साम, दाम दंड भेद वापरलं जात आहे. राजकीय यंत्रणा, पालिकेचा गैरवापर करण्यावर यांचं लक्ष होतं. त्यांनी राजीनामा न घेता अडचणी निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला. ते न करताही ही निवडणूक झाली असती,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“आम्ही गद्दारांसोबत नाही हे दाखवण्यासाठी ही निवडणूक आहे. महाविकास आघाडी एकत्र राहील. जे फुटायचे ते फुटले आहेत. आता त्यांना नजरकैदेत ठेवलं असून, प्रत्येकाच्या कार्यालयात नजर ठेण्यासाठी एक माणसू नेमला आहे,” असा दावाही आदित्य ठाकरेंनी केला.