शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा दिला आहे. तसंच उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असून विरोधकांनी ती पहावी असं आव्हानच दिलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी उल्लेख केलेले ते भाजपाचे साडेतीन लोक कोण आहेत यासंबंधी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत
नागपुरातील नांदगाव, वारेगाव येथील प्रदूषणाचा मुद्दा राज्यात गाजल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी येथे भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाजनकोने टाकलेल्या मंडपात न जाता, थेट गावकऱ्यांनी पंप हाऊसजवळ टाकलेल्या मंडपाला भेट दिली. जमिनीवरच बसून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊतांनी उल्लेख केलेले भाजपाचे साडेतीन लोक कोण?; नाना पटोले म्हणाले, “आज रात्री….”
आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांनी उद्या पत्रकार परिषद घेणार असून भाजपाचे साडे तीन लोक जेलमध्ये असतील असा दावा केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “सामना तर होऊ द्या, आत्ताशी टॉस झाला आहे”.
काय म्हणाले होते संजय राऊत –
“काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असं बोलत आहेत. मात्र, मला असं वाटतं की पुढील काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असतं. पाहू कोणात किती दम आहे. खूप सहन केलं आता उद्ध्वस्त करणार आहे. राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली गेली आहे.”
“मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाहीत. मी तर कधीच घाबरणार नाही. जे करायचं ते करा,” असंही राऊतांनी नमूद केलं आहे.