युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यावेळी भाजपा नेते नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. तसंच देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत. गेल्या काही दिवसांत राणे कुटुंब विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेंसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळूण दौऱ्यावर आहेत.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण, जिल्हा बँक निवडणूक निकाल, नितेश राणे अटक या सर्व घडामोडींनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान चिपी विमानतळावर दाखल झाल्यावर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
Thackeray said Modi being Vishwaguru cant avoid mentioning his name
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

धर्मेंद्र प्रधान यांनी नाणारच्या पुनरुज्जीवनाचे संकेत दिल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“गेल्या दोन महिन्यांपासून करोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर भेटीगाठी होत आहेत, जाहीर कार्यक्रम वाढत आहेत. म्हणूनच अधिवेशनाच्या आधीदेखील फिरत होतो, त्यानंतरही विकासकामाचे कार्यक्रम करत आहोत,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, “राजकीय दौरा असतोच, जिथे जातो तिथे ते येतं. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेक विकासाची कामं झाली असून त्याची उद्घाटनं, लोकांकडून मतं घेणं हेदेखील आहे. कोकणात कधीही आलं की येथे फिरायचा आनंद असतोच”.

नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मतदारसंघ न पाहता जिथे शक्य तिथे जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न असतो. मतदारसंघ कुठेही आणि कोणाचाही असला तरी चांगलं काम करणं आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणं ही प्राथमिकता असते”.

नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “हा एक वेगळा विषय आहे. स्थलांतरित करण्याचा विषय आहेच पण दुसरीकडे न्यायचा तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल. लोकांना सोबत घेऊन, चर्चा करुन, स्थानिक भूमीपुत्रांना न्याय कसा मिळेल याचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल”. हायवे, रस्ता किंवा कोणताही मोठा प्रकल्प असले तर स्थानिक लोकांना, भुमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. एकदा विश्वास बसला, मनातील शंका दूर झाल्यानंतरच आपण ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असंही ते म्हणाले.

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून केलं आहे.

धर्मेद्र प्रधान नेमकं काय म्हणाले –

संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर ६० लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे, असे सांगत धर्मेद्र प्रधान यांनी नाव न घेता शिवसेनेला चिमटा काढला. या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठय़ा प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल, असे धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.

नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. लोकसत्ताच्या व्यासपीठावरुन बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दावा केला आहे. यानंतर नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.