अलिबाग – रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्यानंतर या निर्णयाचे तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले. शिवसैनिकांकडून या निर्णयानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जवळपास दोन तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक शिवसैनिकांनी रोखून धरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’वर संकोच अन् अनास्थेची धूळ

हेही वाचा – सातव्या आयोगामुळे राज्यावर साडेतीन लाख कोटींचा बोजा!

पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. गोगावले यांचा जयजयकार करीत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी जवळपास २ तास महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. आजदेखील याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena angry over raigad guardian minister post to aditi tatkare blocked mumbai goa highway traffic ssb