कोणी मजबुरीने गोमांस खाल्ले असले तरी त्यांच्यासाठी संघाचे दार बंद नाही. आजही त्यांची घरवापसी होऊ शकते, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी जयपूरमधील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेनं भाजपावर टीकास्र सोडलं आहे. जर गोमास खाणाऱ्यांसाठी संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग देशात गोमांसावरून देशात हत्या का घडवून आणल्या? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे.
हेही वाचा – “अदाणी शेअर बाजारातील ‘बिग बुल’, तर मोदी त्यांच्यासाठी…”; ‘काऊ हग डे’वरून शिवसेनेचं टीकास्र!
“…मग लोकांच्या हत्या का घडवल्या?”
“संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी १५ दिवसांपूर्वीच जयपुरात एक खळबळजनक विधान केले. त्यांनी सांगितले, ‘‘गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे आहेत.’’ म्हणजे गाईंना खाटीकखान्यात न्यायची परवानगीच संघाने दिली व इकडे मोदी सरकारने ‘काऊ हग डे’ म्हणजे गाईस मिठी मारण्याचे फर्मान सोडले. गोमांस खाणाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांशी आमच्या गुप्त चर्चा होत असतात”, प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
“भाजपाकडून देशात भावनिक मुद्द्यांचं राजकारण”
“या वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यासाठी जनतेकडे मते मागताना सांगण्यासारखे काहीच नसल्याने मोदी सरकार देशाला पुन्हा धर्म आणि भावनिक मुद्द्यांवर गुंतवीत आहे”, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.
हेही वाचा – राज्यात पुन्हा राजकीय वादळ उठणार? बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”
“महाघोटाळ्यांचे पाप धुऊन निघणार आहे का?”
“हिंदू मतांसाठीच राममंदिर व गाईंचे राजकारण सुरू झाले आहे. गाय हे आपल्या संस्कृतीचे व धर्माचे प्रतीक जरूर आहे. पण गाईला मिठी मारल्यास अदाणींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुऊन निघणार आहे का? वीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी, पण सावरकरांचे गाईंबाबतचे विचार विज्ञानवादी होते. गाय हा एक उपयुक्त पशू आहे, गोमाता नाही, हे मत त्यांनी परखडपणे मांडले. हे वीर सावरकर भाजपा व संघ परिवारास मान्य आहेत काय? गाईला मिठी मारली की भावनिक उन्नती होते, हे मोदी सरकारचे म्हणणे वादासाठी मान्य केले तरी हा प्रकार गाईलाही मान्य असायला हवा ना”, अशी टीकाही शिवसनेनं केली आहे.