लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुक्रवारी आणखी दोन उमेदवार जाहीर केले. नाशिकमधून पक्षाने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उस्मानाबादमधून रवि गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणाला उमेदवारी देते, याकडेही नाशिककरांचे लक्ष लागले आहे. मनसेने प्रबळ उमेदवार दिल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादमधून यंदा ओमराजे निंबाळकर की रवि गायकवाड यापैकी शिवसेना कोणाला उमेदवारी देणार, यावर बरीच चर्चा सुरू होती. यंदा ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. कोणाला उमेदवारी द्यावी, यावर बरेच दिवसांपासून एकमत होत नव्हते. त्याचबरोबर हा मतदारसंघ भाजपलाही देण्याची चर्चा सुरू होती. मात्र, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उस्मानाबाद मतदारसंघ पक्षाला नको असल्याचे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला.
शिवसेनेची नाशिकमधून गोडसे, उस्मानाबादमधून गायकवाड यांना उमेदवारी
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुक्रवारी आणखी दोन उमेदवार जाहीर केले.
First published on: 07-03-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena declared two more candidates