लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुक्रवारी आणखी दोन उमेदवार जाहीर केले. नाशिकमधून पक्षाने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उस्मानाबादमधून रवि गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणाला उमेदवारी देते, याकडेही नाशिककरांचे लक्ष लागले आहे. मनसेने प्रबळ उमेदवार दिल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादमधून यंदा ओमराजे निंबाळकर की रवि गायकवाड यापैकी शिवसेना कोणाला उमेदवारी देणार, यावर बरीच चर्चा सुरू होती. यंदा ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. कोणाला उमेदवारी द्यावी, यावर बरेच दिवसांपासून एकमत होत नव्हते. त्याचबरोबर हा मतदारसंघ भाजपलाही देण्याची चर्चा सुरू होती. मात्र, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उस्मानाबाद मतदारसंघ पक्षाला नको असल्याचे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा