उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु असा सल्ला दिल्याचं वृत्त मी वाचलं. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते जे तुम्हाला वडिलांसमान मानत आहेत त्यांच्याबद्दल असं बोलत असाल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होत असेल? अशी विचारणा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंकडून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने होत असलेल्या टीकेवर नाराजी जाहीर करत प्रत्युत्तरही दिलं.

“धमक्या कोणाला देत आहात?”, केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले, म्हणाले “बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून…”

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
amol kolhe bag checked after uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी, नेमकं काय घडलं?

“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला हे खरं आहे की खोटं समोर आलं पाहिजे. हर्षल प्रधान यांनी हे खोटं आहे असं सांगितलं. पण तसं असेल तर अनिल परब यांचा फोन तपासा. त्यांच्या फोनमधून फडणवीसांना फोन गेला असेल, तर नक्की तसं घडलं असेल. उद्धव ठाकरेंच्या फोनवरुन फोन केला जात नाही हे मला माहिती आहे,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. जर शिंदेंना बाजूला करुन युती करायची असेल, तर मग भाजपाला नकार का देत होतात? अशी विचारणाही केसरकरांनी केली आहे.

“…त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं”

“शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेब एकवचनी होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं गेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण ते मिळालं नाही म्हणून त्यांनी बंड केलं नाही, ते शांत राहिले. आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना भेटायला बोलावलं होतं आणि माझं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देतो सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू आले होते. यातून त्यांची एकनिष्ठता दिसते. मुख्यमंत्रीपद नको, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा. ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. भाजपासोबत युती करा आणि त्याचे मुख्यमंत्री व्हा असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांची बदनामी का केली जात आहे? तुम्हाला आघाडी तोडावीशी का वाटली नाही याचं उत्तर द्या,” अशी विचारणा केसरकरांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ –

“आदित्य ठाकरेंनी वडिलांचं उदाहरण घ्यावं”

“आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसं वागावं, बोलावं यासाठी त्यांनी वडिलांचं उदाहरण घ्यावं. ते जर इतर नेत्यांसारखं बोलू लागले तर हे प्रकरण अजून चिघळेल. ते माझ्यापेक्षा निम्या वयाचे आहेत. पण ते जेव्हा येतात तेव्हा मी उठून उभा राहतो. कारण तो त्यांच्या आजोबांचा मान आहे. आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्याकडे मुद्दे नाहीत असं नाही,” असा इशारा केसरकरांनी दिला.

“आम्हा शिवसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं आमच्या मनाला लागलं आहे. तुम्ही कितीही यात्रा काढा, पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बोलणार,” असा इशारा केसरकरांनी यावेळी दिला.

“एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं”, बंडखोर आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले “सकाळी ८.३० वाजता…”

“आम्ही तुमच्या आदरापोटी शांत आहोत. बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुमच्या रक्तात शिवसेना आहे. पण यांच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवेसना आणली आहे. त्यामुळे तो अभिमान बाळगत असताना सामान्य शिवसैनिकाचा अपमान करु नका. आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना तुम्हीही आदराने बोला. कोर्टात जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करणार आहोत,” असंही ते म्हणाले.

“शिंदेंच्या बंगल्यावर रोज हजार लोक असतात, शिवसैनिकांची रांग असते. आमच्या पाठीवर हात फिरवा इतकीच शिवसैनिकांची अपेक्षा होती. मग तो हात गेल्या काही वर्षात का फिरला नाही? त्यामुळे शिवसैनिका गृहित धरु नका आणि त्याला आव्हानही देऊ नका. अन्यथा सर्वसाधारण शिवसैनिक पेटून उठेल,” असं त्यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे कधी भेटलेच नसल्याने त्यांना खरा शिवैसनिक कोण आणि खोटा कोण हे माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यालाही ते शिवसैनिक म्हणतील असा टोला केसरकरांनी लगावला.