केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेची पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत अनेक मोठे प्रस्ताप मांडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वानुमते पक्षाचे प्रमुख नेते म्हणून जाहीर करण्यात आले. या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला. याबाबतचा पाठपुरावा केंद्राकडे केला जाईल, असंही या बैठकीत ठरण्यात आलं, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. मुंबईतील ताज प्रेसिडन्सिमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची ही पहिली बैठक पार पडली.

शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.
  • राज्यातील भूमिपुत्रांना सर्व प्रकल्पांमधील नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देणे.
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे.
  • UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्या मराठी मुलांना पाठिंबा देणे.