शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी आज भाजपाचे आमदार नितेश राणे यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे बुधवारी कणकवली कोर्टात शरण आले, त्यानंतर युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती. कोर्टाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. दरम्यान शिवसेनेकडून याप्रकरणी प्रतिक्रिया आली असून राणे संत आहेत, त्यांची आरती केली पाहिजे असा टोला लगावला आहे.

Nitesh Rane Case Live : नितेश राणेंची पोलीस कोठडी संपली, आज पुन्हा न्यायालयात…

नितेश राणेंना घेऊन पोलीस कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल; कोर्टाने कोठडी दिल्यानंतर चौकशी सुरु

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील एका कार्यक्रमासाठी चोपडा येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नितेश राणेंच्या पोलीस कोठडीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते महासंत आहेत, १००८ महामंडलेश्वर राणे आहेत. त्यांची आरती केली पाहिजे”.

VIDEO: “अरे नको ना निलेश…”, मोठा भाऊ पोलिसांशी हुज्जत घालत असताना नितेश राणे करत होते विनवणी

दरम्यान यावेळी त्यांना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “ईडी म्हणजे एलसीबी झाली आहे, कुणीही उठावं आणि ईडीला सीडी दाखवावं एवढाच धंदा राहिलेला आहे”.

वाइन विक्री निर्णयावरुन फडणवीसांवर निशाणा

राज्यात वाइन विक्रीच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेते केलेल्या विरोधाला उत्तर देताना ते म्हणाले की, “मध्यप्रदेशात जाऊन देवेंद्र फडणवीसांनी वाइन तिथे जास्त विकली जाते की महाराष्ट्रात याचा अभ्यास केला पाहिजे. मध्य प्रदेशमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी वाईन विक्रीचा संकल्प केला होता. वाइन विक्री ही अनिवार्य नाही, ज्याला वाटेल तो दुकानदार ठेवू शकतो, अन्यथा ठेवू शकत नाही. स्वतःच्या राज्यांमध्ये जेव्हा कायदा मान्य होतो तेव्हा बोलत नाहीत, इथं विरोधाला विरोध करण्याचं काम ते करत आहेत”.

नितेश राणेंची चौकशी

सकाळी १० वाजता नितेश राणे यांना चौकशीसाठी कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. बुधवारी कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांना रात्री सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. सावंतवाडी पोलीस ठाण्यातून सकाळी कणकवली पोलीस ठाण्यात राणे यांना नेण्यात आलं. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे या प्रकरणी तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण –

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.१८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.

या नोटीसीनंतर आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, राकेश परब आदिनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता. या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला. मुंबई उच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आमदार राणे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते तोपर्यंत दहा दिवस त्यांना अटकेपासून सवलत देणारे आदेश न्यायालयाने दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रम्यान दोन दिवसापूर्वी जिल्हा न्यायालयामध्ये नियमित जमीन मिळावा म्हणून आमदार राणे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन अर्ज काल मंगळवारी फेटाळला. त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र ती मागे घेत्याचे अँड सतिश माने शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते.