शिवेसना मुंडावळ्या बांधून बसलेली नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. भाजपाकडून युतीचा प्रस्ताव येत असल्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी हा टोला लगावला. आमचं मॅरेज ब्युरो नाही, शिवसेना शिवसेना आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढण्याची तयारी करत असताना राज्यात अद्यापही शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत निर्णय झालेला नाही. भाजपा शिवसेनेवर टीका करणं टाळत असताना शिवसेना नेते मात्र भाजपावर टीका करताना दिसत आहेत. यामुळे नेमका युतीचा निर्णय होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा अजून लांबण्याची शक्यता आहे.

‘आम्ही स्वबळाची घोषणा केली असून प्रस्ताव घ्यायला बसलेलो नाही. हल्ली सगळ्यांनाच शिवसेनेशी जवळीक साधावं असं वाटत आहे. पण शिवसेना येथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट पाहत बसलेली नाही’, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत युतीच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Story img Loader