शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद सहकारी साखर कारखान्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून आपल्याकडे त्याबाबतचे सर्व पुरावे आहेत, असा दावा दानवे यांनी केला आहे. यामुळे अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे आमने-सामने आले आहेत.

दानवे यांच्या आरोपानंतर भुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना भुमरे म्हणाले की, शरद सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद पडला होता. तो कारखाना आम्ही सुरू केला. याचा त्रास आम्हाला आजही होत आहे. तो कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद पडला होता. त्यामुळे तो कारखाना भंगार झाला होता. तो कारखाना शेतकऱ्यांसाठी सुरू केला. अशा ठिकाणी मनी लॉंडरिंग कसं काय चालू शकतं? तिथे काही मनी लॉंडरिग होत असेल तर त्याचा तपास करावा.

Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
Dawood t-shirt, Lawrence Bishnoi t-shirt,
दाऊद, लॉरेन्स बिष्णोईचे टीशर्ट विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई
case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

हेही वाचा- “…नाहीतर नीलम गोऱ्हे आज शिवसेनेत नसत्या”, नारायण राणेंच्या या विधानावर नीलम गोऱ्हे हसून म्हणाल्या, “मला वाटतं चिंटूचे जोक…”

“अंबादास दानवेंना सध्या काही कामं नाहीत. त्यांना संदीपान भुमरेशिवाय दुसरं कुणी दिसत नाही. त्यांनी विकासावर बोलावं मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. आणि या कारखान्यात काय गैरव्यवहार झाला आहे? हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं” असं आव्हान संदीपान भुमरे यांनी दिलं आहे.

अंबादास दानवेंनी नेमके आरोप काय केले?

संदीपान भुमरेंना उद्देशून केलेल्या आरोपांत अंबादास दानवे म्हणाले, “तुम्ही शरद सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीने चालवता, हे आम्हाला माहीत आहे. हा कारखाना कुणालाही चालवायला दिला नाही, तरीही या कारखान्यातून मनी लॉंडरिंगचा प्रकार सुरू आहे. निश्चितच याचे सर्व पुरावे काही दिवसांत बाहेर येतील. या कारखान्यात कुणाचा पैसा येतो आणि कुणाला पैसा दिला जातो. कारखान्यातील साखर कोण विकतं आणि साखर कोण खरेदी करतं, याचा सगळा तपशील माझ्याकडे आहे. हा तपशील मी इथेच सांगणार नाही. पण हा तपशील एक दिवस सभागृहात मांडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा दानवेंनी दिला आहे.