शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. “बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यायचं असेल तर दोन दिवसात यावं. अन्यथ गद्दारांची हकालपट्टी करू,” असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी केला. आज (२८ जून) जालन्यात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
याआधी बंडखोरांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिला होता. यावर चंद्रकांत खैरे म्हणाले, “बंडखोरांनी यायचं असेल तर २ दिवसांमध्ये परत यावं, नाहीतर तुमची हकालपट्टीच काय सगळीच पट्टी करून टाकू.” यावेळी चंद्रकांत खैरे यांनी दीपक केसरकर गद्दार आहे, असा आरोपही खैरे यांनी केला.
हेही वाचा : “कोणते आमदार संपर्कात आहेत ती नावं सांगा, त्यानंतरच…”; एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान
“गुवाहाटी येथे लपून बसलेल्या बंडखोर आमदारांवर ७ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च टरबुजाने केला. दाढीवाला आधी रिक्षावाला होता. त्या दाढीवाल्याकडे एवढे पैसे कोठून आले?” असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.