राज्यसभा निवडणुकीत पुरेसं संख्याबळ नसताना देखील भारतीय जनता पार्टीनं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. त्यांनी आपले सर्व उमेदवार निवडून आणत मोठा विजयी जल्लोष केला. या हाराकिरीनंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर बोचरी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे पाठिमागे नेलं आणि राज्यसभेच्या पराभवामुळे त्यांची नाच्चकी झाली, अशी टीका राणे यांनी केली होती.

राणे यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “एका पराभवामुळे नाच्चकी झाली असेल तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले होते. मग त्याचं काय झालं, याचा त्यांनी विचार करावा,” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

उद्धव ठाकरे यांनी राज्याला दहा वर्षे पाठिमागे नेलं, याबाबत विचारलं असताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “राज्यसभेची एक जागा पराभूत झाल्याने राज्याच्या विकासात काय फरक पडणार आहे? राणे यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाही, त्यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजावून सांगावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो,” असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

हेही वाचा- ‘…तर मलाही वाटतं उद्धव ठाकरेंनी देशाचं पंतप्रधान व्हावं’, गुलाबराव पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला

नारायण राणे नेमकं काय म्हणाले…
“शिवसेनेला सत्तेत असूनही महाविकास आघाडीची जेवढी मते मिळायला हवी होती तेवढीही मते मिळाली नाहीत. त्यांचे ८-९ आमदार फुटतात. त्यांची विश्वासार्हता कुठे आहे? आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. उलट आम्ही त्यांचीच मते फोडली. राज्यात सत्तेत येण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता असते. मात्र, या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.” ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“निवडणुकीपर्यंत आमचेच आमदार निवडून येतील, अशा बढाया मारणाऱ्यांचे या निवडणुकीने पानिपत केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे,” अशी टीकाही नारायण राणे यांनी केली होती.