सांगलीः आय लव्ह यू म्हणायचे आणि नंतर लफडी करायची ही राजकीय पक्षांची सवयच आहे. भाजपा – शिवसेना युतीच्या काळातही अशी खेचाखेची सुरू होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
सांगली दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार पराभूत झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “सगळेच राजकीय पक्ष अशी खेचाखेची करत असतात. आय लव्ह यू म्हणायचं आणि नंतर लफडी करायची, ही सगळ्याच राजकीय पक्षांची जुनी सवय आहे. शिवसेना आणि भाजपाची युती असताना देखील दोन पक्षांमध्ये अशी खेचाखेची होत होती, असंही ते म्हणाले.
हेही वाचा- “आम्ही डोळे मिटून गप्प बसणार नाही…”, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मी डब्बा आहे आणि उद्धव ठाकरे माझं इंजिन आहेत. ते जिकडे जायला सांगतील, तिकडे मी जाईल. मी शिवसेनेचा मंत्री असल्याने पक्ष विस्तार करणे, कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून संबंधिताना सूचना करणे, हे माझे कर्तव्य आहे. यासाठी मी सांगलीला आलो आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले.