दहीहंडीचे थर रचताना घाटकोपर परिसरातील प्रथमेश सावंत ( २० वर्षे ) हा गोविंदा जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळासासून केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी ( ८ ऑक्टोबर ) हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने प्रथमेशचं निधन झालं. त्याच्या निधानंतर शोककळा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रथमेशच्या मृत्यूनंतर माजी महापौर, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य सरकारवर हल्ला केला आहे. “गोविंदा म्हणून भूमिका बजावताना प्रथमेशचा अपघात झाला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यावर तो औषध उपचारांना प्रोत्साहन देत होता. मात्र, त्याची झुंज अपयशी ठरली. राज्य सरकार स्वत:ला संवेदनशील असल्याचं सांगतं आहे. पण, ती संवेदनशीलता गोविंदांच्या बाबत दिसली नाही,” अशी टीका पेडणेकर यांनी शिंदे सरकारवर केली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

“या साहसी खेळामुळे दोन…”

“गोविंदाना उकसवण्याचे काम राज्य सरकारने केले. विमा कवच आणि ५ टक्के नोकरीच्या आशेने अनेक गोविंदा पथके सराव न करता दहीहंडीत सामील झाले. या साहसी खेळामुळे दोन गोविंदाची प्राणज्योत मालवली,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.

Story img Loader