शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

हेही वाचा- “उद्धवजी ठाकरे, आपण आमच्या कमळाला…”, आशिष शेलारांचं शिवसेना पक्षप्रमुखांना खुलं पत्र!

पेडणेकरांचे दसरा मेळाव्याबाबत दोन सूचक ट्वीट

दसरा मेळावा…आतूरता असं म्हणत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा पाठमोरा फोटो ट्वीट केला आहे. तर फोटोच्या वर

तर दसरा मेळावा शिवतीर्थावरच, मी उद्धवजीं सोबत….असं म्हणत त्यांनी दुसरं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लहान मुलं “दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. मी उद्धवजींसोबतच”, असं म्हणताना दिसत आहेत. या ट्वीटमुळे चर्चांना चांगलचं उधाण आलं आहे.

दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता दरवर्षी होणारा शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुनही वाद चांगलाच रंगला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोघांकडून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेला अत्तापर्यंत २ वेळा पत्र पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही याच जागी दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले आहे. यानंतर शिंदे गटाकडून दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपला दुसऱ्यांचा पक्ष..”

दसरा मेळाव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर निशाणा

यापूर्वीही किशोरी पेडणेकरांनी दसरा मेळ्यावरुन शिंदे गटावर निशाणा साधला होता. “एकीकडे बाळासाहेबांचे नाव वापरायचे, शिवसेनेचे नाव वापरायचे, भाजपाची मदत घ्यायची. हा बाळासाहेबांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांची एक पक्ष, एक झेंडा, एक नेता, एक मैदान ही परंपरा निर्माण केली होती, ती उद्धव ठाकरे यांनी चालवली. पण आता राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वेगवेगळ्या क्ल्युप्त्या काढल्या जात आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या ५६ वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नका”, असे आवाहनही त्यांनी शिंदे गटाला केले आहे. तसेच “शिवसेना नेमकी कुणाची याबाबतचा निर्णय न्यायालयात होईल”, असेही पेडणेकर म्हणाल्या.