शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. तर, ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. यावर कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटावर टीकेचे ‘बाण’ सोडले आहेत.

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय पवार म्हणाले, “शिवसेनेला मिळालेलं धगधगत्या मशालीचं चिन्ह घरोघरी पोहचवण्याचं काम शिवसैनिक करतील. आम्ही ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे,’ ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगाला दिले होते. तुम्ही आनंद दिघेंचं नाव, फोटो छापता मग त्यांचा कुठेतरी उल्लेख करायला हवा होता. आज ना उद्या हे लोक बाळासाहेबांना सुद्धा विसरणार आहेत.”

हेही वाचा – “तुमच्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील,” शिवसेनेची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “एकनाथ शिंदे या गारद्याने…”

“एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या ऐवजी ज्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मुख्यमंत्री झाला, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांचे नाव लावावे. तुम्ही केलेल्या पापाचे प्रायश्चित भोगावे लागणार आहे. शिवसेनेची धगधगती मशाल विरोधकांचा राजकीय नाश करेल,” असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे.

Story img Loader