मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा सांगितला. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ठाकरे की शिंदे? याचा वाद निवडणूक आयोगसमोर सुरु आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय शनिवारी दिला. यावरून आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसेच अशी कृत्य करतात. उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे. ज्या शिवसेनेने मोठे केल, तिचाच घात करण्यात आला. धनुष्यबाण गोठवल्याचा आनंद महाशक्तीला आता खूप होत असेल,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.

“इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा…”

“भाजपा मिंधे गटाचा वापर करुन घेत आहे. त्यांचा वापर झाला की फेकून देतील. निष्ठा ही विकत घेतली जाऊ शकत नाही. शिवसैनिकांनी दमदाटी केली जात आहे. इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा हा प्रकार झाला नव्हता. ते तुम्ही करत आहात. मग, पापी कोण आहे. दिवस उजाडत असतो दिवस मावळत असतो,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.