शिवसेना आणि शिंदे गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत २७ जुलैपर्यंत लेखी स्वरुपात आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर आता भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनाही प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Video: पंजाब पोलीस आणि मुसेवाला प्रकरणातील हल्लेखोरांमध्ये अटारी सीमेजवळ चकमक; गावकऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

काय म्हणाले भरत गोगावले

जे घडत आहे, ते योग्य होत आहे. आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे हा निकालही आमच्याबाजुने लागेल. आम्ही दोन तृतीयंश असल्याने आम्हाला काही अडचण होईल, असे वाटत नाही. मात्र, न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. त्याप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.

हेही वाचा – “…त्या दिवशी भाजपा बंडखोरांना बाजूला करेल”; शिंदे गटासंदर्भात उद्धव ठाकरेंचं भाकित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांबाबत बोलताना ”शिवसेना सोडयाची असेल तर मर्दासारखील सोडा, कटकारस्थान करू नका”, असे म्हटले होते. यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कटकारस्थान आमच्या बापाने शिकवलं नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी जयंत पाटलांना दिले आहे. आम्ही ४० लोक आहे. जेंव्हा ४० लोक सत्ताधारी पक्षातून बाहेर पडतात, तेंव्हा जयंत पाटील यांना समजायला पाहिजे, असेही ते म्हणाले.