मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्याला आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राज्यात याकूब मेमनच्या सुशोभीकरणावरून भाजपने हैदोस मांडला आहे. काट्याचा नायटा करायचा प्रयत्न सुरु आहे. गणपतीसारख्या उत्सवामध्ये विघ्न निर्माण करण्यासारखे खोटे आरोप भाजपचे नेते करत आहेत. तुम्हीच याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिला. त्याचं थडगं तुम्ही उभा केलं. त्याबद्दल माफी मागा,” अशी मागणी करत भास्कर जाधव यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

“अमरावतीच्या खासदारांनी पोलीस स्टेशनमध्ये हैदोस…”

अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार राडा केला. त्यावरूनही भास्कर जाधव यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला आहे. “भाजपच्या सहयोगी खासदारांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. मुलगी पलवून नेली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये हैदोस घातला. तो उभ्या देशाने बघितला. ती मुलगी साताऱ्याला सापडली आहे,” असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla bhaskar jadhav reply bjp leaders over yakub memon grave controversy sss
Show comments