शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पक्षाचे दोन गट पडले आहेत. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं (महाविकास आघाडी) सरकार कोसळलं. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली असून कारवाईची मागणी केली. ठाकरे गटाने यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने आपण विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही असं म्हणत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आज (१४ सप्टेंबर) पहिली सुनावणी घेतली.

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सादर केलेले पुरावे आणि प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केल्यानंतर, तसेच दोन्ही गटातील आमदारांची मतं ऐकल्यानंतर राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल देतील. यावर आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांना याचिकेशी संबंधित कागदपत्र एकमेकांना सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सुनावणीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. व्हीप न पाळल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी आमदार प्रभू यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांची कागदपत्रं एकमेकांना द्यावीत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल.

हे ही वाचा >> “खरे प्रतोद कोण? हा कळीचा मुद्दा ठरला तर…”, आमदार अपात्रतेसंदर्भात आमदार भरत गोगावले स्पष्टच बोलले

दरम्यान, या सुनावणीनंतर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले, विधान भवनात आज महत्त्वाची सुनावणी झाली. दोन्ही वादी आणि प्रतिवाद्यांनी आपापली बाजू मांडली. दोघांच्याही वकिलांनी आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सादर केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी येत्या आठ दिवसांत (२२ किंवा २३ सप्टेंबर) आणि १० दिवसांनंतर (२५ सप्टेंबर) अशा दोन तारखा दिल्या आहेत. आज सुनावणीवेळी एकूण ४१ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या एकत्र करून आगामी दोन तारखांना त्यावर सुनावणी होईल.

Story img Loader