ठाकरे कुटुंबावर आरोपांची जंत्री घेऊन भाजपा नेते किरीट सोमय्या शुक्रवारी कोर्लई गावात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अलिबागचे जावई आहात जावयासारखे या असं म्हणत शिवसेनेनी किरीट सोमय्यांना इशारा दिला आहे.

कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवरील १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लई गावात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. पेण, पेझारी आणि अलिबाग येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर ते सुरवातीला कोर्लई ग्रामपंचायतीला भेट देणार आहेत. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यापूर्वी केलेल्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाकडे विचारणा करणार आहेत. संध्याकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Impeachment motion against Yoon Suk Yeol rejected south Korea
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना दिलासा; यून सुक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव नामंजूर
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
raj thackeray cm devendra fadnavis
Raj Thackeray: …म्हणून राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी झाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “आमच्याकडे त्यांना…”!
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”

किरीट सोमय्या कोर्लई गावासाठी रवाना, शिवसैनिकांसोबत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता; म्हणाले “प्रशासनाने रोखलं तर…”

या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे वाढीव बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जादा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवला जाणार आहे.

“सोमय्या हे अलिबागचे जावई आहेत, त्यांनी जावयासारखे यावे. उन्माद करू नये अन्यथा शिवसेना योग्य उत्तर देईल,” असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. कोर्लई गावच्या सरपंचानी कालच वस्तुस्थिती सांगितली आहे. त्यामुळे सोमय्यांनी उगाच खोटेनाटे आरोप करू नयेत असही त्यांनी म्हटलं आहे. 

Story img Loader