Sanjay Gaikwad Controversial Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. अनेक नाट्यमय घडामोडी आणि उत्सुकता प्रचंड ताणली गेल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर यथावकाश मंत्रीपदांचं वाटप, मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपही पार पडलं. पण आता ज्या मतदारांना निवडणुकीच्या आधी हात जोडून मतांचा जोगवा मागितला, त्याच मतदारांसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या एका आमदारांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी बुलढाण्यात एका जाहीर सभेत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. सभेत बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट मतदानांचा पैशांसाठी विकले गेलेले म्हटलं. संजय गायकवाड एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी “तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या” असं गंभीर विधान केल्यामुळे त्यावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात एका कार्यक्रमानिमित्त आयोजित सभेमध्ये मतदारांवरच टीका केली. “तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे? अरे दोन दोन हजारांत विकले गेले साले. दोन हजारात? पाच हजारात? यांच्यापेक्षा तर रांXXX बऱ्या”, असं संजय गायकवाड यावेळी म्हणाले आहेत.

“अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाळींचं कल्याण करायला निघाला, या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला आहे. माझा त्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. पण हे लोक संजय गायकवाडला पाडा वगैरे म्हणत होते. समजा मी पडलो असतो तर सगळे प्रकल्प होऊ शकले असते का? माझं आव्हान आहे, एक खडाही पडला नसता”, असा दावाही त्यांनी केला. यावेळी आसपासच्या भागातल्या कामांची यादी आणि त्यासाठीचा निधी याची यादी संजय गायकवाड यांनी वाचून दाखवली. शिवाय, समोर बसलेल्या लोकांना उद्देशून “तुम्ही तर परतफेड केलीत. तुमच्याबद्दल हा विषयच नाहीये”, असं म्हणायलाही ते विसरले नाहीत.

Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

अजित पवारांचंही ‘ते’ विधान चर्चेत!

दरम्यान, एकीकडे संजय गायकवाड यांच्या विधानावर संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे अजित पवारांचंही विधान चर्चेत आलं आहे. बारामतीमध्ये एका पेट्रोल पंपाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिले जात होते. त्यानंतर अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं. यानंतर अजित पवार हे काहीसे संतापले आणि म्हणाले, “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला.