एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यातील तापलेलं वातावरण शांत झालं. मात्र, अजूनही शिवसेना आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाताना दिसत आहेत. बंडखोरी करत शिंदेनी भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शिंदेवर टीका केली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत ननविर्वाचित सरकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राऊत यांनी पुन्हा एक मजेशीर व्हिडिओ ट्वीट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- वेषांतर करुन भेटणाऱ्या शिंदे-फडणवीसांना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद…”

‘जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते’..असे कॅप्शन देत संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जंगलात एक आरसा लावण्यात आला आहे. त्या बाजूने एक अस्वल जात असताना आपला चेहरा ते अस्वल आरशात बघते आणि घाबरुन आरसा पाडून टाकते असे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ शेअर करुन राऊत यांनी अप्रत्यक्षपणे बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली होती. जवळजवळ ४० आमदारांनी शिंदेना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे गट भाजपाने युती सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनतील अशी सगळयांना खात्री होती. मात्र, फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे नाव घोषित करताच सगळ्यांना आर्श्चयाचा धक्का बसला होता.

Story img Loader