औरंगाबाद शहराचं नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ’धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादीचा लढाई सुरू झाली आहे. तर दुसरीकडे एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी खासदार जलील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘‘मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली, ते व त्यांचे ४० लोक…’’ ठाकरे गटाचे टीकास्र!

आमदास संजय शिरसाट म्हणाले, “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना हे नाव आवडणार नाही. त्यांचं म्हणणं त्यांच्या पद्धतीने ठीक आहे. त्यांना राजकारण त्यांच्या पद्धतीने करायचं आहे. ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांचे हाल केले. त्या औरंगजेबाचं नाव काढून संभाजी महाराजांचं नाव शहराला देताना यांना का त्रास होतो? तुम्ही औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकवतात. आम्ही तुम्हाला विरोध नाही केला. तुम्ही तुमचं राजकारण करा. परंतु औरंगजेबाबद्दल एवढा तुम्हाला पुळका असण्याचं कारण काय? मग आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवा. राजकारण हे प्रत्येक गोष्टीत नसतं. महापुरुषांचा अभिमान जागृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, तर आमचं काय चुकलं? आम्ही दिलेल्या नावाला तुमचा विरोध असण्याचं कारण काय? त्यांना त्यांचं राजकारण करायचं आहे, त्यांना त्यांची मुघलशाही, निजामशाही, औरंगाबाद, निजामाबाद, उस्मानाबाद ही त्यांची ओळख आम्हाला कशाला पाहिजे.” टीव्ही 9 शी बोलत होते.

हेही वाचा – “नामांतर झालं याचा आनंद आहे, मात्र भाजपाने याचा असुरी आनंद घेऊ नये हे श्रेय…” अमोल मिटकरीचं विधान!

याशिवाय, “त्यांना रस्त्यावर उतरावचं लागेल, कारण यांचं राजकारण जातीपुरतं मर्यादित आहे. आम्ही जर असं काही बोललो तर लगचे आम्हाला जातीयवादी म्हटलं जातं. आता त्यांनी जर बोललं तर ते योग्य आहे, कारण ते जातीसाठी बोलत आहेत? त्याचं राजकारण जातीवरच अवलंबून असल्याने, त्यांना रस्त्यावर उतरावंच लागेल. नाहीतर लोक त्यांना म्हणतील की अरे तुम्ही तर त्यांच्यासोबत गेलात. म्हणून केवळ दाखवण्यासाठी त्यांना ही भूमिका घ्यावी लागते, परंतु त्याचा काही फरक पडणार नाही.” असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

खासदार जलील नेमकं काय म्हणाले? –

“महापुरुषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केलं नाही. हे लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी असं करत आले आहेत. आम्ही नावाचा विरोध केलेल आहे, करत राहणार आहे. कारण, जेव्हा सरकार म्हणून चांगलं काही केलं आहे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे काही नसतं, तर मग अशाप्रकारचे मुद्दे ते वारंवार पुढे आणतात. भावनिक मुद्य्यांमध्ये कसं अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, हे याचं एक प्रमुख उदाहरण आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे, सरकार त्यांचं आहे. उद्या ते कायदा आणू शकता की आमचं नाव बदलायचं आहे. पण घटनेने मलाही एक अधिकार दिलेला आहे. त्यानुसार मी विरोध करणार आहे. ” असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla sanjay shirsat criticism of mim mp jalil stance on aurangabads name change msr
Show comments