राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलकं बाहुलं तर उपमुख्यमंत्र्यांना अलिबाबा म्हणत खोचक शब्दांत टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसासंदर्भात केलेल्या एका विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, “मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची आता कुठे आहेत? ती नाची मी शोधतोय”, असं म्हणत त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. एकीकडे राज्यसरकार परतीच्या पावसामुळे उद्भवलेल्या संकटावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही सरकारला लक्ष्य केलं जात आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

सोमवारी पुण्याला परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलं. यासंदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यावर बोलताना त्यांनी पाऊस किती पडावा, ते महापालिका ठरवत नाही, असं उत्तर दिलं. “पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पुण्यात पडलेल्या पावसाने मागील १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे”, असं फडणवीस म्हणाले होते.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”

दरम्यान, परतीचा पाऊस आणि त्यामुळे झालेलं नुकसान यावरून अरविंद सावंत यांनी राज्य सरकारला लक्ष्य करतानाच देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. “पुण्यात पडलेल्या पावसावर उपमुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ‘पाऊस काय आमच्या कंट्रोलमध्ये असतो का?’ मग मुंबईत पाऊस कुणाच्या कंट्रोलमध्ये असतो? तेव्हा तमाशा करता का? ती नाची कुठे आहेत, ते सध्या मी शोधतोय. मुंबईतल्या खड्ड्यात नाचणारी नाची पुण्यात कशी गेली नाहीत? ती नागपूरला का नाचायला गेली नाहीत? हा खरा प्रश्न आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या अशा मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे”, असं अरविंद सावंत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…”, पुण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

“सतत आम्ही विरोधी पक्षातले लोक ओरडतो, म्हणून किमान पावसाच्या आणि शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावर बैठक तरी झाली. पण त्याशिवाय त्यांना दिसत नाही का? उभ्या महाराष्ट्रात वातावरणातील बदलानंतर पाऊस पडला”, असं ते म्हणाले.

भास्कर जाधवांची सुरक्षा काढण्यावरूनही टीकास्र!

यावेळी बोलताना अरविंद सावंत यांनी भास्कर जाधवांची सुरक्षा काढण्यावरूनही राज्य सरकारला सुनावलं. “आमदार भास्कर जाधव यांचं संरक्षण काढलं आणि तासाभरात त्यांच्या घरावर हल्ला झाला. हे कशाचं द्योतक आहे? ही काय लोकशाही आहे का? त्याचा जितका निषेध करा, तितका थोडा आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यानं फार काही फरक पडत नाही. मुळात लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं विचारांचं आदान-प्रदान आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या अधिकारांवर घाव घालण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. महाराष्ट्रात त्याचं अनुकरण होत आहे”, असं अरविंद सावंत म्हणाले.

Story img Loader