राज्यात सध्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना विरुद्ध काँग्रेस, दुसरीकडे ठाकरे गटक विरुद्ध शिंदे गट तर तिकडे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना पाहायला मिळत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडल्यानंतर त्यातले गट एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पोहरादेवीत बोलताना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावरही टीका केली. त्या टीकेला आता भावना गवळींनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी काल पोहरादेवीत घेतलेल्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांसह विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांनाही लक्ष्य केलं. “आपल्या खासदार ताई तर पळाल्याच होत्या. पण, एकदिवशी फोटो आला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधताना. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मात्र, अख्ख्या देशात तुमच्याच पक्षातील काही दलालांनी आरोप होते की, या खासदार भ्रष्ट आहेत. त्यांच्याच हातून पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली. पुढे चौकशीचं काय झालं?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”

दरम्यान, यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमानंतर टीव्ही ९ शी बोलताना खासदार भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगर पालिकेतील कोविड घोटाळ्याला तोंड द्यायला तयार राहावं, असा टोला गवळी यांनी लगावला आहे.

“आता आम्हाला भीती वाटते ती केसीआर…”, ठाकरे गटाचं सूचक विधान; पंतप्रधान मोदींना केलं लक्ष्य!

“कुणी काय केलं ते लवकरच…”

“भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर सिद्ध झालेला नाही. फक्त त्यावेळी तशी कारवाई झाली होती. पण महानगर पालिकेची जी कोविडमधली चौकशी चालू आहे, त्याचाही उल्लेख करायला हवा. कुणी काय केलं ते लवकरच कळणार आहे. चौकशी सुरू आहे. दूध का दूध आणि पानी का पानी होणारच आहे. त्यामुळे फक्त आमच्यावर आरोप करून चालणार नाही”, असं म्हणत भावना गवळींनी आपल्यावर फक्त भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, असा दावा केला आहे.

VIDEO : “आपल्या खासदार ताई तर पळाल्याच होत्या, पण…”, उद्धव ठाकरे यांची भावना गवळींवर टीका

“महानगर पालिकेतील कोविड घोटाळ्याला तोंड द्यायला त्यांनी तयार राहावं. माझ्या भागातली जनताच ठरवेल की मी निवडून येणार की नाही. मी २५ वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करते”, असंही गवळी म्हणाल्या.

Story img Loader