सत्तेत राहूनही भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात आमचा लढा निजामाच्या बापाशी असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपसह इतर विरोधकांवर टीका केली. शिवसेनेला नडला तो गाडला गेला. एक तर तो राजकारणातून संपला किंवा तुरुंगात जाऊन बसला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इतरांना निजाम म्हणणारे स्वत: औरंगजेबासारखे वागतायंत – भाजप
संजय राऊत म्हणाले, राज्यात लाट फक्त शिवसेनेची आहे. आजही विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर १८० जागा शिवसेनेला मिळतील. सर्वच पक्षांना हे माहिती आहे. भाजपचे नेतेही दबक्या आवाजात आम्हाला हेच सांगताहेत. सत्तेत राहुनही शिवसेनेसारखा दुसरा विरोधी पक्ष नाही, अशी आज आमची प्रतिमा तयार झाली आहे. मोदी सरकार अच्छे दिन आल्याचे सांगत असले तरी महाराष्ट्राला अजून अच्छे दिन आलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत आहेत. पण मराठवाड्यातील दुष्काळ पाहण्यासाठी इथे येण्याला त्यांना वेळ नाही. त्यांनी मराठवाड्यात आले पाहिजे. चंद्रकांत खैरेंना सोबत घ्या. ते तुम्हाला मराठवाड्यातील दुष्काळ दाखवतील, असेही ते म्हणाले.

Story img Loader